अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणी दोघांना अटक

अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी केल्याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी प्रकरणी दोघांना अटक

 

मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी रफिक माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम यांना २१ जून रोजी जोगेश्वरी परिसरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून ३४ हजार रुपये रोख, फिल्मची रील, लोखंडी तिजोरी हस्तगत करण्यात आली आहे. आरोपींनी १९ जूनच्या रात्री अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई परिसरातील खेर यांच्या कार्यालयातील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लांबविल्या होत्या. हे दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.पोलिसांनी सांगितले की चोरट्यांनी अनुपम खेर यांच्या कार्यालयात रात्री बळजबरीने प्रवेश करून ४.१५ लाखांची रोकडीसह साहित्या चोरले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version