वृत्तसंस्था, बर्मिंगहम
असं म्हणतात की या जगात मुलांच्या निरागसतेशिवाय दुसरं काही प्रेमळ असूच शकत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे ही सात वर्षांची अनू. बर्मिंगहममध्ये वास्तव्यास असणाऱ्या अनुला नुकताच एक नवा पाय मिळाला.
जन्मत:च अनुच्या पायात व्यंग होतं. त्यामुळे तिला कृत्रिम पायाचा सहारा घ्यावा लागला. नुकतंच तिला नवीन ब्लेड रनर वापरतात त्या पद्धतीचा कृत्रिम पाय लावण्यात आला. आणि या नवीन पायामुळे उभारी मिळालेल्या अनुने मग आपला हा नवा पाय दाखवण्याकरता थेट शाळेतल्या आपल्या जीवलग मैत्रिणींकडे धाव घेतली.
यावेळी तिच्या मैत्रिणींनीही अतिशय खिलाडू वृत्तीने अनूच्या नवीन पायाचं कौतूक केलं आणि तिच्यासोबत मैदानात धाव घेतली. अनूचा हा व्हिडिओ यूट्यूबवर व्हायरल झाला. या व्हिडिओमुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तर काहींना जगण्याची नवी उभारी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.