NEET Paper Leak Case: मोठी बातमी! NEET पेपर फुटी प्रकरणात आणखी एक संशयित ताब्यात

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत.
NEET Paper Leak Case:  मोठी बातमी! NEET पेपर फुटी प्रकरणात आणखी एक संशयित ताब्यात

देशभरात गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे पोलिसांनी या घोटाळ्यात सहभागी असल्याच्या संशयावरून बिबडेवाडी परिसरातील मनीषा वाघमारे (46) या महिलेला पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे. ही महिला पुण्यात ब्युटी पार्लर चालवत असून, ती पेपरफुटीतील मुख्य आरोपींच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर आता आणखी एका संशयित तरुणाला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

फुरसुंगी परिसरातून संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून अद्याप कोणतीही ठोस माहिती हाती लागलेली नाही. दरम्यान पुढील तपासासाठी संबंधित तरुणाला सीबीआयच्या ताब्यात दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 

दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने पाच जणांना अटक केलं आहे. अटक करण्यात आलेल्या पाच पैकी तीन जण हे राजस्थान जयपूर येथील आहेत, तर एक जण महाराष्ट्रातील असून, एकाला हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथून अटक करण्यात आली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात तपास यंत्रणांची कारवाई सुरूच असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमध्ये अजून किती बडे मासे अडकणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version