बिग बींची ‘ही’आगळी वेगळी पोस्ट पाहिलीत का?

बिग बींची ‘ही’आगळी वेगळी पोस्ट पाहिलीत का?

मुंबई, १७ मे २०२३, प्रतिनिधी : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे समाज माध्यमांवर नेहमीच हा सक्रिय असतात. दरम्यान ते नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत वेगवेगळ्या गोष्टी शेअर करत असतात. अलीकडेच एका अनोळखी दुचाकीस्वारासोबत प्रवास करतानाच एक फोटो बराच चर्चेत आला. त्यांनतर आता बिग बींची आणखी एक पोस्ट चर्चेत आली आहे.

अमिताभ बच्चन हे आपल्या अधिकृत ट्विटर आणि इंस्टग्राम अकाउंटवर त्यांच्या फोटो-व्हिडिओ किंवा प्रमोशनशी संबंधित पोस्ट्स व्यतिरिक्त,अनेक वेळा विचित्र व्हिडिओ देखील पोस्ट करतात. असाच एक व्हिडिओ त्यांनी अलीकडे पोस्ट केलं आहे. हा मजेशीर व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेनासे झाले आहे.


या व्हिडिओत एक गणवेशधारी व्यक्ती रस्त्यावरून चालताना दिसत आहे. त्याचा गणवेश पोलिसांच्या गणवेशासारखा दिसतो पण प्रत्यक्षात तो पोलिस आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. आता त्या व्हिडिओतील व्यक्तीच्या डोक्यावर केस नाहीत, फक्त मागे एक लांब बो घातलेला आहे. तो त्याच्या केसांचा बो गोल-गोल फिरवत चालताना दिसत आहे, जे पंख्यासारखे गरगर फिरताना दिसते. ती व्यक्ती मुद्दाम डोके हलवत असल्याने त्याचे केसही वेगाने फिरत आहेत. हा व्हिडीओ सामायिक करत , बच्चन यांनी “दिवसाच्या भीषण उन्हात, (ही) व्यक्ती स्वत:ला थंड करण्यासाठी स्वत:चा पंखा सोबत घेऊन बाहेर पडला आहे.”असे लिहिले. हे पाहिल्यावर नेटकऱ्यांनी यावर भन्नाट कंमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version