आणखी एका चित्त्याचा मृत्यू

आणखी एका चित्त्याचा मृत्यू

कुनो नॅशनल पार्कमध्ये आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या उदय या चित्त्याचा आजारी पडल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक जेएस चौहान यांनी चित्ता उदयच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चित्त्यांवर नजर ठेवणाऱ्या टीमला रविवारी सकाळी 9 वाजता उदय डोके टेकवून सुस्त अवस्थेत बसलेला दिसला. त्याच्या जवळ गेल्यावर तो उठला आणि लडखडत चालायला लागला. तथापि, एक दिवस आधी केलेल्या निगराणीमध्ये चित्ता निरोगी आढळून आला होता. चित्ता उदयच्या प्रकृतीची माहिती वन्यजीव डॉक्टरांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याची तपासणी केली असता तो आजारी असल्याचे दिसून आले.

वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली की, रविवारी चार वाजण्याच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला आहे. असे त्यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. यातील दोन चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

दरम्यान, उदय या चित्त्याचा मृत्यू नेमका कशामुळं झाला याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याबाबतची माहिती मिळू शकेल असे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितलं. दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या 20 चित्त्यांपैकी आता 18 चित्ते उरले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले होतं. यातील दोन चित्त्यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version