समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना

समृद्धी महामार्गावर आणखी एक दुर्घटना

महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून अंधार असल्याने नेमके कितीजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत हे समजू शकलेले नाही. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गावर पुलाचे काम सुरू आहे. एका खासगी कंपनीने या कामाचे कंत्राट घेतले आहे. सोमवारी रात्री पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू होते. पुलावरील गर्डर जोडणारे क्रेन साधारण १०० फुटांवरून खाली कोसळले. त्यात १० ते १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची भीती प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version