जो दोषी असेल त्याला फासावर चढवा; केजरीवालांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर अण्णा हजारेंची मागणी

जो दोषी असेल त्याला फासावर चढवा; केजरीवालांच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर अण्णा हजारेंची मागणी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप झालेत त्याची चौकशी होणे गरजेची असल्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केली.

 

ज्यानं काही केलं नाही त्याला भीती नसते. केजरीवाल यांच्यावर मंत्रीपदावून काढल्यानंतर करण्यात आलेत. याआधी हे आरोप का झाले नाहीत. त्यामुळे याची चौकशी व्हावी आणि जो दोषी

असेल त्याला फाशीवर चढवा अशी मागणी अण्णा हजारेंनी केली.

 

मंत्रीमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी घेतल्याचा आरोप केला. जैन यांचा 50 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस येऊ नये यासाठी

ही रक्कम केजरीवाल यांनी घेतल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. मात्र, आता या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असल्याची मागणी अण्णा हजारेंनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version