राज्य सरकारच्या वाईनविक्रिच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. अण्णा हजारे यांनी यासंबंधी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण करू नये, अशी विनवणी राज्य सरकारने केली आहे.
राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वत्सला नायर यांनी राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अण्णा हजारे यांना मंत्रिमंडळातील निर्णयाबाबत सविस्तर माहिती दिली तसेच उपोषण करू नये अशी विनंती केली. मंत्रिमंडळात वाईन निर्णयाबाबत अद्यापही चर्चा सुरू असून अंतिम निर्णय झाल्यानंतर अण्णा हजारे यांनी आपली भूमिका ठरवाली अशी विनवणी प्रधान सचिव वत्सला नायर यांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.