जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
भ्रष्टाचारविरोधी आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे लवकरचं दिल्लीत उपोषणाला बसणार आहेत.
काही दिवसांपूर्वीच देशभरात लोकायुक्तांची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीबाबत अण्णांनी मोदींना पत्र लिहिलं होते.
दरम्यान अण्णांनी अहमदनगर येथे पालकमंत्री राम शिंदेची भेट घेऊन लोकपाल बिलाबाबत केंद्र शासन उदासीन असल्याची खंत व्यक्त केली.
अण्णा सर्व देशातील प्रत्येक राज्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. त्यात दिल्लीच्या आंदोलनाबाबत रणनीती आखणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगिते. तर, राम शिंदेंनी पालकमंत्री म्हणून अण्णांची भेट घेतली असल्याचं स्पष्ट केेले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.