Anjana Krishna: उपमुख्यमंत्री अजित पवारांशी नडल्या महिला पोलीस अधिकारी, कोण आहेत अंजना कृष्णा?

उपमुख्यमंत्र्यांशी नडणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे, चला तर मग जाणून घेऊयात...
Anjana Krishna: उपमुख्यमंत्री अजित पवारांशी नडल्या महिला पोलीस अधिकारी, कोण आहेत अंजना कृष्णा?

मुंबई: सध्या समाज माध्यमांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांना दम दिल्याचा व्हिडीओ चर्चेत आहे. हे प्रकरण सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात घडले आहे. या गावात अवैध मुरुम उत्सखनन सुरु असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली होती. त्यानंतर तहसिलदार आणि तलाठी कारवाईसाठी कुर्डू गावात पोहोचले. तसेच आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा देखील त्यांच्या पथकासह गावात पोहोचल्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या व्हिडीओ कॉलद्वारे संभाषण झाले. या संभाषणाचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे. यानंतर उपमुख्यमंत्र्यांशी नडणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आहेत तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे, चला तर मग जाणून घेऊयात…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महिला पोलीस अधिकाऱ्याला व्हिडीओ कॉलद्वारे दम दिल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अंजना कृष्णा या कुर्डू गावात कारवाईसाठी गेल्या होत्या. तेवढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांना फोन केला. दरम्यान, अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना चांगलाच दम दिला. दोघांच्या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेत आहे. 

हेही वाचा: Amol Mitkari: 'माझी वैयक्तिक भूमिका…', अजित पवारांच्या व्हायरल कॉलवर अमोल मिटकरींची दिलगिरी

कोण आहेत अंजली कृष्णा? 
अंजली कृष्णा या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे पूर्ण नाव अंजना कृष्णा वी. एस आहे. त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1997 साली झाली. त्या केरळा तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मलयंकीजू गावातील आहेत. त्यांचे वडील बीजू हे कपड्यांचा छोटासा व्यवसाय चालवतात. अंजना कृष्णा यांची आई स्थानिय न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करत आहेत. त्या अगदी सामान्य कुटुंबातून आल्या आहेत. अजंली कृष्णा यांचे प्राथमिक शिक्षण हे पूजप्पुरामधील सेंट मॅरीज सेंट्रल स्कूलमधून झाले. त्यानंतर त्यांनी नीरमंकरा येथील HNMSPB NSS कॉलेज फॉर वुमेनमध्ये अॅडमिशन घेतले. बीएससी पदवी संपादन करुन अंजली या UPSC परीक्षेच्या तयारी लागल्या होत्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले आहे. अंजली कृष्णा यांनी UPSC CSE 2022-23 मध्ये AIR-355 रँक मिळवत आयपीएस पद मिळवले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version