अंजली दमानियांनी एकनाथ खडसेंमागचा पाठपुरावा अद्याप सोडलेला नाही

अंजली दमानियांनी एकनाथ खडसेंमागचा पाठपुरावा अद्याप सोडलेला नाही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अंजली दमानियांनी एकनाथ खडसेंमागचा पाठपुरावा अद्याप सोडलेला दिसत नाही. आता दमानिया यांनी माहितीच्या अधिकाराखाली काढलेला खडसेंच्या चौकशीचा झोटिंग समितीचा अहवाल कुठे हरवला, असा प्रश्न उपस्थित केलाय.

खडसेंच्या चौकशीचा समितीचा अहवाल दमानिया यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला अर्जाद्वारे दिला होता. हा अर्ज सामान्य प्रशासन विभागाकडेही पाठवण्यात आला होता असं दमानिया यांनी सांगितले.

मात्र, प्रशासन विभागानं अर्ज मिळाला नसल्याचा दावा केलाय. त्यामुळे झोटिंग समितीवर जनतेचे 45.52 लाख रुपये खर्च झाले असूनही जनतेला हा अहवाल  का उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, असा सवाल दमानिया यांनी विचारला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version