रामदास कदम यांच्या आरोपानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

रामदास कदम यांच्या आरोपानंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

रामदास कदम शिवसेनेला रामराम करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहेत. रामदास कदम शिवसेनेवर नाराज असून ते शिवसेनापदाचा राजीनामा देणार असल्याची मनाची खदखद त्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितली. तसेच त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. यावर अनिल परबांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेचा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा अनिल परबांचा डाव असल्याचा आरोप रामदास कदम यांनी अनिल परबांवर केला आहे. यावर अनिल परब म्हणाले, मी रामदास कदम यांच्या आरोपांवर काहीही बोलणार नाही. मी खरा शिवसैनिक आहे. शिवसेना सोडणार नसल्याची भूमिका रामदास कदम यांनी घेतली आहे. त्यामुळे आता रामदास कदम यांनी केलेल्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते रामदास कदम नेतेपदाचा राजीनामा देणार का? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले असून पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत मनाची खदखद बोलून दाखवली. रत्नागिरी जिल्हा शिवसेना कार्यकारिणीतून रामदास कदम यांच्या समर्थकांना हाकलण्यात आले होते. तसेच आमदार योगेश रामदास कदम यांचे महत्त्व कमी करण्याच प्रयत्न प्रयत्न करण्यात आला असन रामदास कदम यांना नव्या सत्ता समीकरणात तर विधान परिषदेतूनही त्यांना डावलण्यात आल्यामुळे शिवसेने नेते रामदास कदम शिवसेनेवर भडकले असल्याची चर्चा वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रामदास कदम शिवसेना सोडणार का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version