अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; २९ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; २९ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी

  खंडणीप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत आणखी १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी अनिल देशमुखांना येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असल्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनेक आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीने देशमुखांना समन्ससुद्धा बजावले होते. मात्र देशमुख ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाही. त्यानंतर इतके दिवस बेपत्ता असलेले अनिल देशमुख न्यायालयात हजर झाले. त्यामुळे त्यांची १३ तास चौकशी केल्यानंतर अनिल देशमुखांना अटक करण्यात आली. न्यायालयाने देशमुखांना १५ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. मात्र आज पुन्हा देशमुखांच्या कोठडीत वाढ झाली आहे. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुखांना ईडी कोठडी सुनावली आहे.

  अनिल देशमुखांच्या ईडी कोठडीत वाढ झाली असून त्यांना आणखी १४ दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत अनिल देशमुखांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version