जय महाराष्ट्र न्यूज, सांगली
सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या 2 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान दोन गाड्या जप्त केल्या आहेत. अनिकेत कोथळेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता.
आंबोली घाटात त्याचा मृतदेह जाळल्याने तिथे जाण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर केला याचा शोध पोलिसांकडून घेण्यात आला याप्रकरणी तपासादरम्यान पोलिसांनी दोन गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये एक बुलेट आहे जी याप्रकरणी अटकेत असलेले पोलीस उपनिरिक्षक युवराज कामटेची असल्याचं सांगण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.