जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
घाटकोपरमध्ये शिवसेनेतला अंतर्गत वाद चव्हाट्यावर पोहोचलाय. बाहेरून पक्षात आलेल्या लोकांना प्राधान्य दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. ईशान्य मुंबईची “नवनिर्माण शिवसेना” या नावानं नाराज़ शिवसैनिकांनी घाटकोपरमध्ये बॅनर लावलेत.
राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना घेण्याऐवजी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाच पक्षात का घेत नाहीं? असा सवाल या होर्डिंगच्या माध्यमातून करण्यातून आलाय. या होर्डिंगमुळे पक्षातील नाराजी उघड झालीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.