5 ऑक्टोबरला अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन

5 ऑक्टोबरला अंगणवाडी सेविकांचं जेलभरो आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी संप पुकारला आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे आजवर 151 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपाचा 24वा दिवस. मात्र, यामुळे मुलांचे अतोनात हाल होत आहेत. 73 लाख मुलांना पोषण आहार मिळत नाही. त्यात 151 मुलांचा मृत्यू झाला. मात्र, त्याची पर्वा ना अंगणवाडी सेविकांना, ना सरकारला.

मागणी मान्य होईपर्यंत अंगणवाडी सेविका संपावर ठाम आहेत. तर सरकारही याबाबत अद्याप ठोस निर्णय घेताना दिसत नाहीये. यापार्श्वभूमीवर 5 ऑक्टोबरला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जेलभरो आंदोलन पुकारल्याची माहिती मिळत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version