जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अंगणवाडी सेविकांचा संप सलग आठव्या दिवशीही सुरूच आहे. या संपामुळे सतत 8 दिवस 73 लाख मुलांना पोषण आहार मिळालेला नाही. मानधन आणि शासकीय सेवेत कायम करण्याच्या मागण्यांवरून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा संप सुरुच राहणार असल्याची माहिती आहे.
अंगणवाडी कृती समिती आणि वित्तमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसून, ठोस आश्वासन न मिळाल्याने हा बेमुदत संप सुरुच ठेवण्याचा आक्रमक पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे. मात्र त्यामुळे मुलांचा हाल होत आहेत.
अंगणवाडी सेविका, मदनीस यांच्या प्रमुख मागण्या –
-अंगणवाडी सेविकांना शासकीय सेवेत कायम करावे
-अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन दुप्पट करावे
-टीएचआर बंद करून योग्य पर्यायी आहार द्यावी
-पूरक पोषण आहाराची रक्कम तिपटीने वाढवावे
-जून महिन्यापासूनचे मानधन त्वरीत द्यावे
-अंगणवाडी केंद्राचे भाडे, टीएचआर, छापील रजिस्टर्स, पूरक पोषण आहाराची रक्कम त्वरीत द्यावी
कोणत्या राज्यात अंगणवाडी सेविकांना किती मानधन मिळते –
– तेलंगणात अंगणवाडी सेविकांना रु.19,480
– तेलंगणात अंगणवाडी मदतनीसांना रु. 13,330
– दिल्लीत अंगणवाडी सेविकांना रु. 9,760
– दिल्लीत अंगणवाडी मदतनीसांना रु. 4,839
– तमीळनाडूत अंगणवाडी सेविकांना रु.8,500
– तमीळनाडूत अंगणवाडी मदतनीसांना रु.4,200
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.