अहमदनगर, ५ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: सकल हिंदू समाजाच्या वतीने शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मांतरण आणि लव्ह जिहादचा आरोप करत हिंदू संघटनांनी या मोर्चाचं आयोजन केल असून आठ दिवसांपूर्वी तीन अल्पवयीन मुलींनी तर दोन दिवसांपूर्वी दोन मुलींनी राहुरी पोलीस चौकीत यासंदर्भात तक्रार सुद्धा दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी विधान परिषदेत सुद्धा यासंदर्भात लक्षवेधी मांडण्यात आली होती. शनिवारी या मोर्चाच आयोजन करण्यात आला असून अहमदनगर दक्षिणेचे खासदार सुजय विखे आणि भाजपचे आमदार नितेश राणे हे सुद्धा या जन आक्रोश मोर्चा सहभागी होणार आहे. राहुरी शहरातून हा मोर्चा संपन्न झाल्यानंतर जाहीर सभा सुद्धा घेण्यात येणार आहे.
मोर्चासाठी वायएमसी मैदानावर आता गर्दी होण्यास सुरवात झाली असून पुढच्या काही वेळेत या ठिकाणाहून या मोर्चाला प्रारंभ होणार आहे.. राहुरी शहराबरोबर राहुरी तालुका कडकडीत बंद ठेवत नागरिक मोर्चात सहभागी होत आहेत. वाय एम सी मैदानावर भगवं वादळ तयार झाल्याचं दिसून येतंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.