Mumbai KEM Hospital : मुंबईच्या KEM रुग्णालयात 27 वर्षीय रुग्णानं संपवलं जीवन; नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ

मुंबईतील प्रसिद्ध आणि गोरगरिबांसाठी परवडणारे महापालिकेचे रुग्णालय किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय मुंबईची ओळख म्हणून ओळखले जातो. दरम्यान या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे.
Mumbai KEM Hospital : मुंबईच्या KEM रुग्णालयात 27 वर्षीय रुग्णानं संपवलं जीवन; नातेवाईकांचा रुग्णालयात गोंधळ

मुंबईतील प्रसिद्ध आणि गोरगरिबांसाठी परवडणारे महापालिकेचे रुग्णालय किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय मुंबईची ओळख म्हणून ओळखले जातो. दरम्यान या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या KEM रुग्णालयात 27 वर्षीय रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरविंद लोहार असे रुग्णाचे नाव असून अरविंद लोहार हा डोंबिवलीत राहत होता. महिना भरापासून त्याच्यावर KEM रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटेच्या सुमारास रूम साफसफाईसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रूममधून बाहेर जाण्यास सांगितले होते. याच दरम्यान अरविंदने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरा पासून ते अनेक सुविधा आत्महत्या करताना कर्मचारी व रुग्णालयाच्या व्यवस्थापकांचे लक्ष का नाही? असा आरोप करत, रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान या तरुणांच्या आत्महत्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version