Palghar Dahanu Crime : लव्ह जिहाद वादानंतर डहाणू पुन्हा हादरले! मध्यरात्री मुस्लिम तरुणाचा हिंदू तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

डहाणूच्या कासा येथे मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एका मुस्लिम तरुणाने घरात शिरून एका हिंदू तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Palghar Dahanu Crime : लव्ह जिहाद वादानंतर डहाणू पुन्हा हादरले! मध्यरात्री मुस्लिम तरुणाचा हिंदू तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

डहाणू तालुक्यातील कथित लव्ह जिहाद आणि अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरण अजून ताजे असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डहाणूच्या कासा येथे मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एका मुस्लिम तरुणाने घरात शिरून एका हिंदू तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यानंतर कासा पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचा पाहायला मिळालं.

तसंच या घटनेच्या निषेधार्थ कासा , चारोटी आणि वरोती या तीन गावांमध्ये बंद पाळण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे . पीडित तरुणी आपल्या घरात झोपली असताना या नराधमाने रात्री तिच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र तिने वेळीच आरडाओरड केल्याने शेजारी राहणाऱ्या महिलांनी एकवटून या नराधमाला चांगला चोप दिला.  आज दुपारच्या सुमारास कासा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात विनयभंगासह अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे  . या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं .

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version