अमृतसर अपघातात रेल्वेनं चिरडलेल्या मृतांची संख्या 61 वर तर 70 जण जखमी

अमृतसर अपघातात रेल्वेनं चिरडलेल्या मृतांची संख्या 61 वर तर 70 जण जखमी

पंजाबमध्ये रेल्वेखाली चिरडून 61 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अमृतसरजवळील जोडा रेल्वेफाटक इथे घडली आहे. 

‘रावण दहन’ पाहण्यासाठी जमलेली गर्दी रेल्वे रुळावर थांबलेली असताना अनेक लोक धावत्या गाडीखाली चिरडले गेले तर 51 जण जखमी झाले आहेत.

पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत, अमरिंदर सिंग यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली त्यांनतर त्यांनी रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची भेट घेतली.

कसा घडला हा दुर्देवी अपघात

  • विजयादशमीनिमित्त ‘रावण दहना’चा पारंपरिक कार्यक्रम सुरू होता.
  • हा कार्यक्रम मानावाला आणि फिरोजपूर रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत सुरू होता आणि तो पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली होती.
  • दहन सुरू होताच रावणाच्या पुतळ्याच्या पोटातील फटाके जोरात वाजून फुटू लागले, त्यामुळेही अनेक लोक रेल्वे ट्रॅकवर आल्याचं काही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
  • रावण दहनाचे दृश्य मोबाइलमध्ये कैद करण्यातही शेकडो लोक गुंग झाले असतानाच जालंधरहून अमृतसरकडे वेगाने निघालेली गाडी या मार्गावरून धडाडत आली.
  • फटाक्यांच्या आवाजात आणि प्रकाशात गाडीचे लाईट आणि आवाज कुणाला ऐकूही गेले नाहीत आणि ट्रॅकवर उभ्या असलेल्या लोकांना धडक देत गाडी वेगाने पुढे गेली.
  • या अपघातानंतर 3 तासांहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.

रेल्वेमंत्री पियूष गोयल हे अमेरिका दौऱ्यावर असून दौरा थांबवून ते मायदेशी परतणार आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version