पंजाबच्या अमृतसरमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला. रेल्वे अपघातामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
ही दुर्घटना अमृतसर आणि मनावला दरम्यान फाटक क्रमांक 27 जवळ झालीये. ज्यावेळी ही दुर्घटना घडली तेव्हा शेजारी असलेल्या मैदानात रावण दहनाचा कार्यक्रम सुरु होता.
रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते. यावेळी डीएमयू ट्रेन क्रं 74943 त्या ठिकाणाहून जात होती.
रावण दहन सुरु असताना फटाक्यांच्या आवाजात लोकांना ट्रेनच्या हॉर्नचा आवाज ऐकू आला नाही त्यामुळे एवढा मोठा अपघात घडला. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर पंजाब सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे.
या कार्यक्रमात पर्यटनमंत्री सिद्धू आणि त्यांची पत्नी उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.