गुजरातमधील अमरेलीमध्ये प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले; पायलटचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार, प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान अमरेली येथील एका निवासी भागात कोसळले. या विमान अपघातात दोन वैमानिक होते.
गुजरातमधील अमरेलीमध्ये प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले; पायलटचा मृत्यू
Edited Image, X

अमरेली: गुजरातमधील अमरेली येथे खासगी विमान कोसळले. वृत्तानुसार, हे विमान एका पायलट प्रशिक्षण केंद्राचे होते. या अपघातात विमान चालवणाऱ्या पायलटचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे विमान अमरेली येथील एका निवासी भागात कोसळले. या विमान अपघातात दोन वैमानिक होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलिस अमरेलीतील गिरिया रोडवर पोहोचले, जिथे ही घटना घडली. 

झाडावर आदळले विमान –  

विमान एका झाडाला धडकले आणि नंतर एका मोकळ्या जागेवर कोसळले. अमरेलीचे पोलिस अधीक्षक संजय खरात यांनी या घटनेची माहिती दिली आहे. अमरेलीचे पोलिस अधीक्षक संजय खरात यांनी सांगितले की, अज्ञात कारणांमुळे दुपारी 12.30 च्या सुमारास अमरेली शहरातील गिरिया रोड परिसरातील एका निवासी भागात विमान कोसळले, ज्यामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – सौदी अरेबियाकडून पंतप्रधान मोदींचे खास स्वागत, पहा व्हिडिओ

अपघातानंतर विमानाला आग – 

विमानाने अमरेली विमानतळावरून उड्डाण केले होते. शास्त्री नगर परिसरात विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि ते आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले. या अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला तर दुसरा पायलट गंभीर जखमी झाला.

हेही वाचा –पती 10 दिवसांपूर्वी दुबईहून आला होता, पत्नीने प्रियकरासह मिळून केला गेम; मृतदेह 50 किमी दूर टाकला

या प्रकरणाची माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितलं की, स्थानिक पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे खरे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. अग्निशमन अधिकारी एस.सी. गढवी यांनी सांगितले की, विमान अपघात आणि विमानात आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक अग्निशमन विभागाच्या चार पथके शास्त्रीनगरमध्ये पोहोचली. विमान प्रथम झाडावर पडले आणि नंतर जमिनीवर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version