उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावरून मोठ्या प्रमाणत चर्चा सुरू आहेत. अनेकांनी हा अपघात नसून घातपात असावा अशी शक्यता वर्तवली आहे. अशातच आता अमोल मिटकरींनी अनेक शक्यता वर्तवल्या आहेत ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. विमानाचा पायलट सुमित कपूर याला संमोहित (Hypnotize) केले होते का, असा धक्कादायक सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
अमोल मिटकरी म्हणाले की, “VSR कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले. ती कंपनी आधीच नादुरुस्त होती, वर्षांभरापासून कंपनीवर बंदी होती. आणि तेच विमान अजितदादांसाठी 28 तारखेला दिल्या जात आहे. दुसरीकडं, डिसेंबर 2025 च्या महिन्यात VSR कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा कंपनीने उतरवला.
नंतर ते म्हणाले की, “जर 50 कोटींचा विमा उतरवला गेला असेल, आणि जो पायलट वेळेवर बदलला गेला असेल अन त्याला हिप्नोटाइज केल होते का?, त्याला आमिष दाखवलं होत कां? अनेक ठिकाणी हिप्नोटाइज करून सुसाईड बॉमरचा वापर केला जातो. दरम्यान, अजमल कसाब याला दहशत वादी हल्ल्यासाठी पाठविल होतं. दुसरीकडे राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती, त्यावेळी देखील असा प्रयत्न केला गेला होता”.
पुढे ते म्हणाले की, “पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं कां?, हा मोठा प्रश्न आहे. कारण, पायलेटने MAYDAY कॉल दिला नाहीये. टेकऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं, मात्र, तेही त्याने केलं नव्हतं. त्यामुळं आम्हाला मोठी शंका VSR कंपनीवर आहे, 50 कोटींचा विमा काढून हे कृत्य करा लावलं कां? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे”, अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.