अमोल कोल्हे यांचा खासदारकीचा राजीनामा

अमोल कोल्हे यांचा खासदारकीचा राजीनामा

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप झालेला असतानाच शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले?

‘सध्याची राजकीय परिस्थिती पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पक्ष फोडणे, आमदारांची पळवापळवी, काहीही करून सत्ता मिळवण्याचा अट्टाहास हे पाहून लोकशाहीतील तत्व, मुल्य, लोकप्रतिनिधींची जबाबदारी, नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. असं असेल तर सर्वसामान्य मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाचं काय?’ ‘सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती मनाला पटत नाही. म्हणूनच नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या खासदारकीचा राजीनामा द्यायचा विचार करत आहे, कृपया याबाबत मार्गदर्शन करा,’ असं अमोल कोल्हे शरद पवारांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत.

या भेटीमध्ये शरद पवारांनी लोकांच्या विश्वासाची जाणीव करून दिल्याचंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. तसंच आपण राष्ट्रवादीने बोलावलेल्या उद्याच्या बैठकीला हजर राहणार असल्याचंही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version