अमोल किर्तीकरांचं तिकीट निश्चित ?

अमोल किर्तीकरांचं तिकीट निश्चित ?

मुंबई , १९ मे २०२३, प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातही राजकारण्यांची खलबते सुरु झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवणुकीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे.

या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून, ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांत आपला उमेदवार जवळपास निश्चित केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात चांगलीच गाजते आहे.

ठाकरे गट मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. “अमोल कीर्तिकरांना बाळ द्या, असे आवाहन देखील ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबीरात केले आहे. गजानन कीर्तिकर सध्या शिवसेना आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघात पिता-पुत्रांमध्ये एका नव्या लढाईला सुरवात होणार का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version