जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
अहमदनगरच्या केडगावात गोळीबार आणि कोयत्यानं वार करून दोघांची हत्या करण्यात आलीय. याप्रकरणी शिवसेनेतर्फे जिल्हा बंदची हाक देण्यात आलीय. या घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलीस उपअधीक्षक अक्षय शिंदे आणि कोतवालीचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांना निलंबित करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांनी केलीय.
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे अशी हत्या झालेल्या दोघांची नावं आहेत. या घटनेनंतर संतप्त शिवसैनिकांनी सुवर्णनगरमध्ये दगडफेक करत वाहनांची तोडफोड केलीय. सध्या सुवर्णनगर परिसरात तणावपूर्वक वातावरण निर्माण झालंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.