अमिताभ बच्चन – ऋषी कपूर 26 वर्षांनंतर एकत्र

अमिताभ बच्चन – ऋषी कपूर 26 वर्षांनंतर एकत्र

वृत्तसंस्था, मुंबई

 

नसीब चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या छोट्या भावाची भूमिका निभावत ‘चल मेरे भाय’ म्हणणारे ऋषी कपूर आता त्यांच्या मुलाची भूमिका निभावताना दिसणार आहेत.

 

विशेष म्हणजे बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 26 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

 

या सिनेमात अमिताभ बच्चन 102 वर्षांच्या वृद्धाची, तर ऋषी कपूर 75 वर्षीय वृद्धाची भूमिका साकारणार आहेत.

 

1991 मध्ये आलेला ‘अजुबा’ त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर दोघांनी एकत्र काम केलं नाही. पण आता 26 वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र येत असून जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करताना दिसतील.   

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version