सावरकरांवर टीका करणाऱ्यांना येणारी पिढी माफ करणार नाही- अमित शहा

सावरकरांवर टीका करणाऱ्यांना येणारी पिढी माफ करणार नाही- अमित शहा

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

सावरकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आधी सावरकर वाचावा, त्यानंतर वीर सावरकरांवर टीका करण्याचा नैतिक अधिकारच राहणार नाही अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ठाण्यात केली.

 

29 व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात त्यांनी ही टीका केली. ज्याच्या नावापुढे “वीर” लावले अशा देशभक्ताला इतर पदवीची गरजच नाही, या शब्दात त्यांनी सावकरांचं गोडवे गायले.

 

वीर ही पदवी आतापर्यंत कोणालाच मिळाली नाही अशा सावकरांवर टीका करणाऱ्यांची कीव येते असा टोलाही त्यांनी लगावला तर सावरकरांवर टीका करणाऱ्यांना या देशातली पिढी कधीच माफ करणार नाही अशी टीका त्यांनी सावरकर विरोधकांवर केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version