जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपा आमदार अमित साटम यांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपप्रकरणी आता पालिका अभियंत्यांच्या युनियनने उडी घेतलीय. अमित साटम यांच्या ऑडिओ क्लिपची चौकशी करा अशी मागणी पालिका अभियंता युनियचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी केलीय. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आमदार अमिम साटम यांची तक्रार करणार असल्याचंही साईनाथ राजाध्यक्ष म्हणालेत.
साटम यांनी एका अभियंत्याला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आलीय. मात्र, आमदार अमित साटम यांनी ही ऑडिओ क्लिप आपली नसल्याचे स्प्ष्टीकरणही दिलंय. दरम्यान, याप्रकराणीच चौकशी करण्याची मागणी साईनाथ राजाध्यक्ष यांनी केलीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.