उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलं आदित्य आणि अमित आले एकत्र

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मुलं आदित्य आणि अमित आले एकत्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत्र येतील हे कोणालाच माहित नाही. मात्र, त्यांची मुलं  म्हणजे आदित्य आणि अमित ठाकरें फुटबॉलप्रेमामुळे एकत्र आले.

 

शनिवारी रात्री फुटबॉल लीग स्पर्धेनिमित्त आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकमेकांची भेट घेतली. लोअर परळमधील पॅलेडिम हॉटेलमध्ये दोघांची भेट झाली.

 

यावेळी दोघांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. आदित्य ठाकरे एमडीएफएचे अध्यक्ष असल्यामुळे एका फुटबॉल स्पर्धेच्या आयोजकांनी आदित्य यांची भेट मागीतली होती. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी फिगो ह्यांची सदिच्छा भेट घेतली तिथे अमित ठाकरे देखील उपस्थित होते असा खुलासा शिवसेनेकडून करण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version