आंबोली घाटात फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर आधी ही बातमी वाचा

आंबोली घाटात फिरायला जाण्याचा प्लान करत असाल तर आधी ही बातमी वाचा

जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग

 

आंबोलीतल्या कोणत्याही पर्यटनस्थळांवर संध्याकाळी 6 ते पहाटे 6 वाजेपर्यंत विनापरवाना जाण्यास पोलिसांनी मनाई केली आहे. अर्थात ही मनाई सध्या एका महिन्यापुरती असणार आहे.

आंबोलीतल्या महादेवगड पॉईंट, कावळेसाद, हिरण्यकेशी, नांगरदास आणि मुख्य धबधब्यावर ही बंधने घालण्यात आलीये.

या पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी आंबोलीतल्या पोलिस दूरक्षेत्रावर त्याची कल्पना द्यावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आंबोलीमध्ये मृतदेह सापडण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या. त्यावर उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने ही पावले उचलली आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version