पंतप्रधान ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाल दिवा बंद

पंतप्रधान ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा लाल दिवा बंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रपती असो किंवा पंतप्रधान आता लाल दिवा सर्वांसाठीच कामयचा बंद करण्यात आला आहे. जो लाल दिवा मिळण्यासाठी आटापिटा केला जायचा तोच लाल दिवा आता कायमचा बंद होणार आहे.

 

केंद्रीय मंत्रिमंडळानं लाल दिव्याचं व्हीआयपी कल्चर बंद करण्याचा निर्णय घेतला. 1 मेपासून अर्थातच कामगार दिनापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री किंवा अधिकारीही आता गाड्यांवर लाल दिवा लावू शकणार नाहीत.

 

फक्त फायर ब्रिगेड, पोलीस आणि रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवांनाच निळा दिवा लावता येणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयानं ही शिफारस केली होती. तसाच नियमांतही बदल केला जाणार आहे. नितिन गडकरांनी याची लगेच अंमलबजावणी करत त्यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version