Ambenali Ghat : पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

Ambenali Ghat : पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

रायगड : पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठीसाठी बंद करण्यात आला आहे. रायगडमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळं जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे. आज 3 जुलैपासून 6 जुलैपर्यंत आंबेनळी घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. पोलादपूर – महाबळेश्वर राज्य महामार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी आज, 3 जुलैपासून 6 जुलै असे 4 दिवस पुढील आदेश येईपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक पावसाच्या ऑरेंज आणि रेड अलर्टवेळी पूर्णपणे बंद राहील, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. या कालावधीत माणगाव-ताम्हाणी मार्गे पुणे-सातारा आणि पोलादपूर चिपळूण-पाटण-सातारा-कोल्हापूर अशी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे.

हेही वाचा : Malegaon News : मुसळधार पावसाचा फटका! घरचा स्लॅब कोसळून पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले; दुर्घटनेत आजी-नातवाचा मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version