चोरीकरून तरुणीवर बलात्कार, अंबरनाथमधील घटना

चोरीकरून तरुणीवर बलात्कार, अंबरनाथमधील घटना

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

अंबरनाथ-टिटवाळा रस्त्यावर तरुणाची हत्या करुन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. संजय नरवडेला असं आरोपीचं नाव असून 30 वर्षाच्या संजय नरवडेला ठाणे पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहे.

त्याने पैशाच्या हव्यासाने ही चोरी केली नंतर तरुणीवर आकर्षण वाटल्यामुळे बलात्कार केला. संजय उल्हासनगरला राहणारा असून रिक्षाचालक म्हणून काम करतो. अशी लज्जास्पद कबुली संदय नरवाडेने दिली.

ठाणे पोलिसांना सापळा रचून संजयला अटक केली. संजयला उद्या दुपारी एक वाजता कल्याण सत्र न्यायालयात हजर करणार आहेत.

मूळचा शहापूरचा असलेला आणि अंबरनाथला चायनिजच्या दुकानात काम करणारा गणेश दिनकर हा कल्याणला राहणाऱ्या तरुणीसोबत रस्त्याच्या बाजूच्या झाडाच्या आडोशाला बसला होता. मात्र तिथे अचानक आलेल्या दोन लुटारुंनी त्याच्याकडे गाडीची चावी आणि पैसे मागितले. त्याला गणेशने नकार देताच त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या.

त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तरुणीवर बलात्कार करुन त्याची गाडी घेऊन चोरटे निघून गेले. या सगळ्या घटनेनं या परिसरात एकच खळबळ उडाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version