अंबादास दानवेंची भाजपावर टीका

अंबादास दानवेंची भाजपावर टीका

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप 240 आणि शिवसेनेला 48 जागा देणार असल्याचे विधान केले. मात्र, बावनकुळेंच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे यांनी ट्विट केले की, ‘२०२४ विधानसभेत मिंधे गटाला ४८ जागा देण्याचं सांगत बावनकुळे यांनी भाजपचा प्लॅन जाहीर करून टाकला. ‘बाळासाहेबांचा विचार’ पुढे नेणाऱ्या बेगडी मिंधे गँगची हीच किंमत का मग? उचला अजून ‘महाशक्ती’च्या पालख्या! आता कळलं असेल उद्धव साहेबांनी का लाथ मारली भाजप सोबतच्या युतीला!’

राऊत काय म्हणाले?

‘ज्या शिवसेनेने एका जागेसाठी युती तोडली होती, त्या 40-45 जणांवर तुकडे फेकलेले आहेत. यांना आयुष्यभर तुकडेच फेकले जातील. ते तुकडे तोंडात ठेवूनच चघळत त्यांना जगावं लागेल. तसेच शिवसेनेला कुठलाही स्वाभिमान उरला नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.’

हेही वाचा : एका जागेसाठी शिवसेनेनं युती तोडली होती – संजय राऊत

भाजपा चिन्हावरच 288 जागा लढवल्या जातील – जयंत पाटील

भाजप शिवसेनेला 48 जागा सोडायला तयार दिसतयं मात्र, निवडणुकीला अजून एक वर्ष असून 288 जागा भाजप चिन्हावरच लढवल्य जातील आणि त्यानंतर शिवसेनेचा नामोनिशाणही राहणार नाही, असा टोला जयंत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version