रेल्वे प्रशासनाने आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकचे नियोजन केले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे मार्ग आणि पश्चिम रेल्वे येथे विविध कामांसाठी मेगाब्लॉक घेतला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक असून हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकापर्यंत मेगाब्लॉक आहे. तर पश्चिम मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही जलद मार्गावर आहे.
मध्य रेल्वे – माटुंगा ते मुलंडपर्यंत सकाळी सकाळी 10.57 ते दुपारी 3.52वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रलपर्यंत सकाळी 10.57 ते दुपारी 03.52 वाजेपर्यंत दोन्ही मार्गावर असणार आहे.
हार्बर रेल्वे – सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे पर्यंत अप मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत असणार आहे.
तर डाऊन मार्गावर 11.10 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे हार्बर मार्गावरील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मध्य तसेच पश्चिम मार्गावर फेऱ्या उशिराने धावणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.