मुंबई, ३० मे २०२३ , प्रतिनिधी : अभिनेता अक्षय कुमारच्या हटके स्टाईलचे आणि त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. अशातच अलीकडेच तो मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसला. यावेळचा त्याचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर बराच व्हायरल होत आहे.
नुकताच अभिनेता अक्षय कुमार मुंबई विमानतळावर दिसला होता. यावेळी अक्षय ऐवजी सगळ्यांचा नजरा त्याच्या पाठीवरच्या बॅगेकडे वळल्या. विमानतळावर अक्षय एक अनोखी बॅग घेऊन जाताना दिसला.
अक्षयच्या बॅगेचे वैशिष्ट्य म्हणजे या एलईडी बॅगवर दोन लाल डोळे देखील आहेत आणि हे डोळे मिचकवतात . या बॅगची किंमत सुमारे 35 हजार रुपये आहे असे म्हंटले जात आहे. अक्षयची ही अतरंगी बॅग पाहून आता चर्चा होऊ लागल्यात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.