अक्षय कुमार, सायना नेहवालला नक्षलवाद्यांकडून धमकी

अक्षय कुमार, सायना नेहवालला नक्षलवाद्यांकडून धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. अक्षय आणि सायनाला नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.

 

छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. यानंतर अक्षय कुमार आणि सायना नेहवालने शहीद जवानांचा कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती.

 

त्या मदतीलाच आक्षेप घेत नक्षवाद्यांनी चक्क एक पत्रक काढून जीवे मारण्याची धमकी दिली. यापुढे नक्षली हल्ल्यात शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करु नका, असा इशाराही नक्षलवाद्यांनी दिला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version