मराठीतल्या अॅक्शन हिरोच्या पाठीशी बाॅलिवुडचा खिलाडी

मराठीतल्या अॅक्शन हिरोच्या पाठीशी बाॅलिवुडचा खिलाडी

वृत्तसंस्था, मुंबई

सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ हा आगामी चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर झय़ळकणार आहे.  त्याचबरोबर मराठीतला  अॅक्शन हिरो अंकुश चौधरीचा आगामी चित्रपट ‘देवा’ हा देखील पडद्यावर झळकणार आहे.

त्याचबरोबर ‘गच्ची’ हा चित्रपट देखील पडद्यावर झळकणार आहे. हे तिन्ही चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहेत

 हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर भिडणार आहेत. मात्र ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटामुळे मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाहीयेत.

बॉलिवूड विरुद्ध मराठी असे दोन गट पडले असताना. खिलाडी अक्षय कुमारने लोकांना ‘देवा’ चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.

विशेष म्हणजे अक्षय कुमार मराठीत बोलत आहे. अक्षय कुमार आणि सलमान खान खूप चांगले मित्र आहेत.

मात्र, अक्षयने ट्विट करत अंकुश चौधरीचा ‘देवा’ हा मराठी चित्रपट पाहण्याचं आवाहन सोशल मिडीयाद्वारे केलं आहे .

यावेळी त्याने प्रमोद फिल्म्स हे इंडस्ट्रीत आपले गॉडफादर असल्याचं सांगितलं आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version