जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रीय पुरस्कारासाठी मी पात्र नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर माझा पुरस्कार परत घेऊन टाका असं वक्तव्य अभिनेता अक्षय कुमारनं केले आहे.
रुस्तम या चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.
मात्र, ही घोषणा झाल्यापासून अक्षयच्या निवडीवरून सिनेसृष्टीत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
दंगल, पिंक यासारखे चांगले चित्रपट असतानाही अक्षयला पुरस्कार कसा काय मिळाला..असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय..तसंच दिग्दर्शक प्रियदर्शन ज्युरींमध्ये असल्यानंच अक्षयची निवड झाल्याचा आरोपही केला जातोय..
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.