खास शैलीत अजित पवारांनी केली नारायण राणेंवर टीका

खास शैलीत अजित पवारांनी केली नारायण राणेंवर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

हल्लाबोल यात्रा सुरु करताना या आंदोलनाला इतका जबरदस्त पाठिंबा मिळेल याची मला देखील कल्पना नव्हती. जनता या सरकारला त्रस्त झाली आहे, हे परळीच्या सभेला जमलेल्या गर्दीवरून दिसतेय, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

नांदेडच्या उमरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची हल्लाबोल आंदोलन आयोजित करण्यात आलं होतं. साडेतीन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही, असं ते म्हणाले.

आपल्या भाषणात अजित पवारांनी नारायण राणे यांचाही उल्लेख केला. नारायण राणे यांनी राजीनामा दिला. आता त्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात पडल्या सारखी झालीय. असं अजित पवार यांनी म्हटलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version