मुंबई, २ मे २०२३, प्रतिनिधी : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. पवारांच्या यानिर्णयाने कार्यकर्ते भावूक झाले. तर दुसरीकडे अजित पवारांचा वेगळा सूर लागल्याचे दिसून आले.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
तुम्ही गैरसमज करून घेत आहात की शरद पवारांनी पद सोडलं म्हणजे ते बाजूला जातील. पण तसं होणार नाही. नवीन नेतृत्वाकडे संधी दिली जाणार आहे. उद्या येणारा नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे. कोणी येरा गबाळा अध्यक्षांची निवड करणार नाही. शरद पवार यांनी म्हटलं आहे की भाकरी फिरवायची वेळ आली आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिल. कुणीही अध्यक्ष झालं आणि प्रांताध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्याच जीवावर पक्ष चालणार आहेत.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालीचनवीन अध्यक्ष काम करेल. देशभरात मीटिंग करणं, लोकांना भेटणं सुरू राहिलं. कुणी पण अध्यक्ष झालं प्रदेशाध्यक्ष झालं तरी शरद पवार यांच्या मनाप्रमाणे पक्ष चालणार आहेत. प्रमुखांना एकत्र बसवून निर्णय घेत असतात आणि आज अचानक हा निर्णय घेतला यांची कुणाला माहिती नव्हती. भाकरी फिरवायची म्हणाले मात्र त्यांनी स्वतःपासून फिरवली.
याचवेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं तर काही वेळा झापलं. याशिवाय अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीचं कारण सांगितलं. वयामुळे हा निर्णय कधी ना कधी घ्यावाच लागेल, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचं बोलून झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांना बोलण्याची विनंती केली. मात्र त्याचवेळी अजित पवार यांनी तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून अधिकारवाणीने सांगतोय, असं सुप्रिया सुळेंना खडसावलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.