अजित पवार आणि सुनिल तटकरेंचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल

अजित पवार आणि सुनिल तटकरेंचा शिवसेना-भाजपवर हल्लाबोल

जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड

 

नांदेड महापालिकेच्या निकालावरून भाजपसह शिवसेनेलाही जनतेने जागा दाखवली असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरेंनी नागपुरात केलीय.

सरकारने आजपर्यंत घेतलेल्या निर्णयांचा चांगलाच समाचार अजित पवार आणि सुनिल तटकरेंनी घेतलाय.

नोटबंदीचे दुष्परिणाम दिसून आलेयेत तसेच शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीसुद्धा फसवी ठरलीये. लोडशेडिंगमुळे शेतीला पाणी देता येत नाही त्यामुळे जनता त्रस्त असल्याचेही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणालेयेत.

अंगणवाडी सेविकांच्या समस्या सुटल्या नाहीत. भोंगळ कारभाराने सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी झालं असल्याची टीका अजित पवारांनी केलीये.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version