छत्रपतींची योजना अन् मोगलांचा जीआर; अजित पवारांची कडाडून टीका

छत्रपतींची योजना अन् मोगलांचा जीआर; अजित पवारांची कडाडून टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सरकारने छत्रपती शिवाजी महारांच्या नावाखाली कर्जमाफी योजना राबवली. पण निघालेले जीआर हे मोगलाईला लाजवणार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित

पवारांनी केली आहे.

 

नवी मुंबईत आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सरकार अजुनही शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

तर, समृद्धी महामार्गावरही तोंडसूख घेत असमाधानी शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात मांडणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

 

तसेच समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला तर आम्ही विरोध करू अशी भूमिकासुद्धा स्पष्ट केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version