…तर भविष्यात कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत – अजित पवार

…तर भविष्यात कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत – अजित पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भविष्यात कोपर्डीसारख्या दुर्दैवी घटना घडूच नये यासाठी सर्व समाजाने अंतर्मुख होऊन एकत्रित प्रयत्न करावेत असे राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी म्हंटले आहे. सर्वांनी प्रयत्न केल्यास अशा घटना घडणार नाहीत. 

कोपर्डी येथील बलात्कार व खून प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय पिडीत मुलीस व तिच्या कुटुंबियांना न्याय आणि समाधान देणारा असल्याचे देखील पवार म्हणाले.

कोपर्डीचा निकाल समाजातील अप-प्रवृत्तींना आळा बसविणारा आहे. कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दोषींना दिलेल्या फाशीच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो.

दोषी पुढे उच्च न्यायालयात जाऊ शकतात, त्यावेळी राज्य सरकारने सक्षमपणे बाजू मांडून ही शिक्षा कायम राहील असा प्रयत्न करायला हवा व या नराधम आरोपींची फाशीची शिक्षा लवकरात लवकर अंमलात आणली गेली पाहिजे. ट्वीटरद्वारे अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version