अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री

अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री

अजित पवार राजभवनात दाखल झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.राष्ट्रवादीमध्ये मोठं भगदाड पडलं असून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांकडे ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यासह ९ नेत्यांनी आज शपथ घेतली.

राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांना पद आणि गोपीनयतेची शपथ घेतली. अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार झाले आहे. राज्यात राष्ट्रवादी, शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर महायुतीचं बळ वाढलं आहे.

अजित पवार यांना राज्यपाल रमेश बैस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यानंतर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. आज एकूण 9 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत या सर्व मंत्र्यांचे खाते वाटप करण्यात येणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version