सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणीत वाढ

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांना क्लिन चीट नाही, अशी माहिती एसीबीनं ईडीला दिली.

 

ईडीनं एसीबीकडून सिंचन घोटाळयाच्या तपासाची माहिती मागितली होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची एसीबीनं चौकशी केली होती. त्यामुळे पवारांची यामध्ये भूमिका काय आहेत, हे तपासण्यासाठी एसीबीकडून ईडीनं कागदपत्रं मागवली होती.

 

त्यात अजित पवारांना क्लिन चीट दिलेली नाही, असं एसीबीनं स्पष्ट केलं. त्यामुळे आता ईडीकडून पवारांची चौकशी होणार का? याकडे लक्ष लागलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version