माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना एका माजी सैनिकाच्या रोषाला सामोरे जावं लागलं आहे. बारामतीत दुष्काळी दौऱ्यादरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना अजित पवार आणि माजी सैनिक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अजित पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना अचानक एका माजी सैनिकाने दादांना थेट सवाल केला, ‘तुम्ही मला पेट्रोल पंप मिळवून देण्यास मदत का केली नाही?’, असा जाब ज्ञानदेव गवळी या माजी सैनिकाने अजित पवारांना विचारला. त्यावर अजित पवार यांनी सुरुवातीला ज्ञानदेव गवळी यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
काहीही न ऐकता तुमच्यामुळेच मला पेट्रोल पंप मिळाला नाही हेच सांगत होते, शेवटी वैतागलेल्या अजित पवार यांनी पेट्रोल पंप मिळवून देणं हे माझं काम नाही, तुम्ही माजी सैनिक असल्याचा आदर करतोय तर आपण त्याचा सन्मान ठेवावा अशा शब्दात संताप व्यक्त करत सभेची सांगता केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.