आता तरी खरं सांगा नाहीतर चक्की पिसिंग अँड पिसिंग करावं लागेल; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

आता तरी खरं सांगा नाहीतर चक्की पिसिंग अँड पिसिंग करावं लागेल; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार म्हणजे रोखठोक व्यक्तिमत्व. अजित पवारांची बोलण्याची शैलीही अगदी गावरान ढंगातील.

 

याच गावरान ढंगात अजित पवारांनी सरकारवर शेलक्या शब्दात आसूड ओढले. एवढंच नाही तर कर्जमाफीवरही त्यांनी विनोदी ढंगात शेतकऱ्यांना बनवेगिरी न करण्याचे

आवाहन केले.

 

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळतेय. पण, त्यासाठी कर्जमाफीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करु नका. उगाच तसा प्रयत्न केलात तर नको तिथे जाऊन बसावं लागेल अशा शब्दात

त्यांनी शेतकऱ्यांना सावध केले.

 

त्याचवेळी कार्यकर्त्यांनी खरी माहिती देण्यावरुन केलेल्या गोंधळावरुनही त्यांनी झापले. सरपंच निवडीवरुनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. उद्या मुख्यमंत्रीही

जनतेमधून निवडाल. सरपंच पदाच्या थेट निवडीचा निर्णय घेऊन भाजप सरकार हुकूमशाही पद्धतीनं निर्णय घेत असल्याची टीका त्यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version